नाम फाउंडेशन
नाम फाउंडेशन हे नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे या अभिनेत्यांनी सुरु केलेली एक धर्मादाय संस्था आहे. ह्या संस्थेची स्थापना सप्टेंबर २०१५ मध्ये झाली. हि संस्था महाराष्ट्रातील दुष्काळी भागांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करते.
ऑगस्ट - सप्टेंबर २०१५ च्या दर्म्यान महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाडा या दुष्काळी भागांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी वैयक्तिक पातळीवर आर्थिक मदत केली. सुरुवातीला नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २०१५ या वर्षी आत्महत्या केलेल्या २३० शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १५ हजारांचा धनादेश, ब्लँकेट, साडी-चोळी, वर्षभराचे मेडिकल किट असे मदतीचे स्वरूप होते.परंतु, फक्त काही निवडक कुटुंबीयांना मदत करण्यापेक्षा या मदतीची व्याप्ती वाढवण्यासाठी नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी एका सामाजिक संस्थेची स्थापना करण्याचे ठरवले. मदतीचे स्वरूप फक्त आर्थिक मदत न रहाता, शेतकऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना काही पर्यायी उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देणे याकडे पण लक्ष देता यावे यासाठीसुद्धा या संस्थेची कल्पना पुढे आली.[३] या कल्पनेचे रुपांतर नाम फाउंडेशन या संस्थेमध्ये झाले. नाना पाटेकर यांनी सप्टेंबर २०१५ मध्ये पुण्यातील धर्मादाय सहआयुक्त कार्यालयात संस्थेची नोंदणी केली